Ad will apear here
Next
शहापूर येथे ‘महिला आणि कायदे’ यावर व्याख्यान


शहापूर : तालुक्यातील वाशाळे (कसारा) येथे डोळखांब एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने ‘महिला व कायदे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यात कसारा-देऊळवाडी येथील अॅड. रेखा सावंत यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी अॅड. कल्पेश पाटील, उपसरपंच श्री. धानके, प्रा. काव्या पाटील, प्रा. निर्मला पांढरे यांसह बचत गटातील महिला उपस्थित होत्या. अॅड. सावंत यांनी व्याख्यानादरम्यान कौटुंबिक हिंसा कायदा, महिला संरक्षण अधिनियम २००५ याबद्दल सविस्तर माहिती दिली. ‘स्त्रियांसाठी एक, दोन नव्हे, तर तब्बल ४० कायदे असूनही महिला असुरक्षित आहेत. महिलांचा आवाज दबविला जातो. यासाठी सर्वांची एकी होणे गरजेचे आहे,’ असे अॅड. सावंत यांनी सांगितले.

अॅड. कल्पेश पाटील म्हणाले, ‘भारतात दरवर्षी ४० हजार डॉक्टर सहा लाख मुलींचे गर्भपात करतात. महिला सर्व क्षेत्रात पुढे आहेत. जिद्दीमुळे आज त्या डॉक्टर, इंजिनीअर, वकील या पदांवर पोहोचल्या आहेत. पहिल्या मराठी राष्ट्रपती होण्याचा मान प्रतिभाताई पाटील यांना मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ ला हिंदू कोड बिल तयार केले. आज समाजामध्ये स्त्री-पुरुष भेदभाव केला जातो. यात आपली मानसिकता बदलली पाहिजे. पुरुषप्रधान संस्कुतीमध्ये स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान दिले जाते.’ याप्रसंगी अंतराळवीर कल्पना चावला यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

उपसरपंच प्रा. पाटील यांनी सद्य परिस्थितीवर भाष्य केले. कविता जगताप यांनी सूत्रसंचालन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZJJBV
Similar Posts
शहापूर येथील तरुणांनी जपली सामाजिक बांधिलकी शहापूर : इंग्रजी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टी, फिरणे या नियोजनात सर्वजण गुंतलेले असताना शहापूर कुणबी महोत्सव समिती, वासिंद येथील कुणबी प्रतिष्ठान व वासिंद विभागातील तरुणांनी मात्र गरिब व गरजूंवर मायेची ऊब पांघरत नववर्षाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले आणि समाजासमोर एक आदर्श घालून दिला.
मारुती कांबळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित शहापूर : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या महाराष्ट्र शासन आदिवासी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमातून आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा नुकताच उत्साहात झाला. यात प्रकल्पातर्फे चालवण्यात येणाऱ्या आश्रम शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. या सोहळ्यात मारुती ज्ञानदेव कांबळे
सिद्धार्थ फाउंडेशनतर्फे शालेय साहित्याचे वाटप शहापूर : सिद्धार्थ फाउंडेशन या संस्थेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत ‘एक वही एक पेन’ अभियान राबविले होते. या अभियानांतर्गत मिळालेल्या वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पाट्या या शालेय साहित्याचे वाटप वासिंद (जिजामाता नगर) येथील रायकरपाडा जिल्हा परिषद शाळेत आठ जुलैला करण्यात आले
महेश धानकेंना राज्यस्तरीय वृत्तरत्न पुरस्कार जाहीर शहापूर : तालुक्यातील पत्रकार, तसेच लोकहिंद न्यूज चॅनल व शिवमार्ग लाइव्ह या वृत्तवाहिनींचे परखड आणि अभ्यासू संपादक महेश धानके यांना कोल्हापूर येथून प्रकाशित होत असलेल्या ‘आजची रणरागिणी’ या साप्ताहिकाच्या वतीने २०१९चा राज्यस्तरीय वृत्तरत्न सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language